Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 11 >> 

1जेव्हा इस्त्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या मुलांला मिसरातून बोलावले.

2त्यांना जितके बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तिस धुप जाळत.

3तरी तो मीच ज्याने एफ्राहमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.

4मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जु काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.

5काय ते मिसरात परत येणार? काय अश्शूर त्यावर राज्य करणार? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?

6त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत:चा योजनांमुळे होईल.

7माझ्या लोकांना मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.

8हे एफ्राहमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्त्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोइमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.

9मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राहमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.

10ते माझ्यामागे चालतील यहोवा मी सिंहासारखी गर्जना करेल मी खरोखर गर्जेल आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.

11ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.

12एफ्राहम मला लबाडीने आणि इस्त्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत मजबरोबर विश्वासू आणि पवित्र बनून आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hosea 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran