Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 5 >> 

1त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गाइलेले गीत,

2इस्त्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून देवाचा धन्यवाद करा.

3राजांनो, ऐका; अधिपतीनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.

4हे परमेश्वर, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदु गाळले; मेघांनीही जलबिंदु गाळले;

5देवासमोर डोंगर थरथरा कांपले, इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.

6अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्याकाळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गानी प्रवास करीत.

7मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्त्राएलांत माता म्हणून मी प्रसिध्द होईपर्यंत, इस्त्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;

8लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्त्राएलातील चाळीस हजारामध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?

9माझे मन इस्त्राएलाच्या अधिपतीकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही देवाचा धन्यवाद करा.

10पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, ह्याचे गुणगान करा.

11पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने देवाच्या विजयाचे, इस्त्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात त्यासमयी देवाचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.

12जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.

13त्या समयी उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वरचे लोक माझ्याकरिता वीरांविरूध्द सामना करावयास उतरले.

14अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राईमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अमलदार उतरून आले.

15इस्त्राखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्सखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.

16खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचार-विनिमय झाला.

17गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसुन राहिला, आपल्या धक्क्यावर बसुन राहिला.

18जबुलून व नफताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यावर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.

19राजे येऊन लढले, त्या समयी कनानाचे राजे मगिद्याच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रूप्याची काहीच लूट मिळाली नाही.

20आकाशांतून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.

21कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंम्मत धरून पुढे चाल.

22त्यासमयी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.

23देवाचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यांतल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण देवाला साहाय्य करावयास वीरांविरूध्द देवाला साहाय्य करावयास ते आले नाहीत.

24केनी हेबेर ह्यांची स्त्री याएल ही सगळया स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!

25त्याने पाणी मागितले तो तिने त्याला दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.

26तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोडयाला घातला; तिने हातोडयाने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.

27तिच्या पायाखाली तो वाकला व पडला निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.

28सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकाना कोणी खीळ घातली?

29तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;

30त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकएक किंवा दोन दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे लूटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भूषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना?

31हे देवा, तुझे सर्व शस्त्रु असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उद्य पावणाऱ्या सूर्यासमान होवोत. मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran