Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 16 >> 

1शमशोन गज्जात गेला आणि तेथे एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.

2गज्जेकरास सांगण्यात आले होते, शमशोन तिथे आला आहे; तेव्हा गज्जकरांनी ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्यांच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पहात राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळी उजेडेपर्यत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्याला जिवे मारू.

3शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछाण्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगरच्या वेशीची दरवाजे व दोन्ही दारबाह्या सुद्धा धरले. ती त्याने जमिनीतून उखडून ओढून काढली, दांडा, आणि सर्व, आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेली.

4त्यानंतर असे झाले की तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका बाईवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.

5पलीष्ट्याचे राज्य करणारे अधिकारी तिच्याजवळ येऊन आणि तिला म्हणाले, तू शमशोनाला युक्तीने त्याचे महान सामर्थ्य कशात आहे ते पहा, आणि आम्ही त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्याला बांधू, अशा प्रकारे आम्ही त्याला नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ. तू हे कर आणि आम्ही प्रत्येक जण तुला अकरा अकराशें शेकेल चांदीचे नाणे देऊ.

6आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, मी विनंती करते तुझे महान बळ कशांत आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधला म्हणजे तू शक्तिहीन होशील, हे कसे शक्य आहे? हे मला सांग.

7तेव्हां शमशोनाने तिला सांगितले, जर त्यांनी मला सात हिरव्या ज्याची सालपटे कधीच सुकली नाहीत, अशा फोकांनी बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईल.

8नंतर पलीष्टांच्या अधिकाऱ्यांनी सात सालपटे जी कधी सुकली नव्हती, अशी ती तिच्याजवळ नेली, तिने त्याला बांधले.

9तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसले होते, आणि तिने त्याला म्हटले, हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत. तेव्हा जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो, तसे ते सालपटे तुटून गेली; आणि त्याच्या बळाचे रहस्य ते समजू शकले नाही.

10दलीला, शमशोनाला म्हणाली, पाहा, तू मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली; तुझ्यावर कश्याने मात करता येईल, मी विनंती करते मला सांग.

11तेव्हां त्याने तिला सांगितले, जर त्यांनी मला नव्या दोरांनी बांधले ज्या कधी कामात वापरल्या नाहीत, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईन.

12तेव्हां दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्याला बांधले, आणि त्याला म्हटले, हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत. तेव्हा जे आतल्या खोलीत वाट पहात पडले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.

13दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तू मला फसवीत आणि मजशी लबाडया करीत आलास; तुझ्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू माझ्या डोक्याच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराची फणीच्या नखात वळवशील तर मी इतर माणसारखा होईन.

14तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले; व त्याला म्हणाली, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन विणण्याची खुंटी व माग यांसुद्धा उखळून निघाला.

15ती त्याला म्हणाली, तू कसे म्हणू शकतो मी तुझ्यावर प्रेम करतो, जर तुझे रहस्य तू माझ्याबरोबर व वाटून घेत नाहीस? तीन वेळा त् माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.

16तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर दबाव आणला की, त्याला मरून जाण्याची इच्छा झाली.

17म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीहि वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर माणसासारखा होईन.

18जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलीष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे. तेव्हां पलीष्टयांचे अधिकारी तिच्याजवळ गेले, आणि त्यानी आपल्या हाती चांदी नेले.

19मग तिने त्याला आपल्या मांडीवर गाढ झोपलेला होता. तिने माणसाला बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या; तिने त्याला ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्यातून निघून गेले.

20ती म्हणाली, हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्याला सोडले होते, हे त्याला कळले नाही.

21पलीष्ट्यांनी तर त्याला धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर याला खाली गज्जात नेऊन पितळ्याच्या बेड्यानी बांधले; मग तो बदिशाळेत दळीत असे.

22तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.

23मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याजवळ मोठा यज्ञ अर्पण करण्यास करावयास एकत्र जमले; कारण की ते म्हणाले, आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.

24तेव्हा लोकानी त्याला पाहून आपल्या देवाची स्तुति केली; कारण त्यानी असे म्हटले की, आमच्या देवाने जो आमचा शत्रू त्यावर विजय मिळवला आहे आणि आमचा देशाता नाश करणारा, ज्याने आमच्यांतल्या पुष्कळांना मारले, त्याला आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.

25आणि जेव्हा ते आनंद सासरा करत होते तेव्हा त् ते म्हणाले, तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आम्हास हसविल. तेव्हा त्यानी शमशोनाला बंदिवानांच्या घरांतून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्याला खांबांच्यामध्ये उभे केले होते.

26शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, ज्या खांबांचा इमारतीला आधार आहे, ते मी चापसावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्यांवर टेकेन.

27ते घर तर पुरुषानी व स्त्रियानी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्रीपुरुष गच्चीवरुन शमशोनाची गंमत पाहत होते.

28तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळयांविषयी पलीष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.

29नंतर ज्या दोन मधला खांबांवर घर राहिलेले, आणि ज्यांचा आधार पावलेले होते, त्यांतला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.

30तेव्हा शमशोन बोलला, पालिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो; मग तो बळाने लावला, आणि ते घर त्या अधिकाऱ्यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडले; असे तो जिवंत असतांना त्याने जे मारले होते, त्यांपेक्षा आपल्या मरणकाळी जे मारले ते अधिक झाले.

31नंतर त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरचे सर्व यांनी खाली जाऊन त्याला उचलले, आणि त्याला नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा बाप मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्त्राएलांचा न्याय केला होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran