Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 15 >> 

1कांही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, मी माझ्या बायकोच्या खोलीत जाईन; परंतु तिच्या बापाने त्याला आत जाऊ दिले नाही.

2तिचा बाप म्हणाला, मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतो, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.

3तेव्हां शमशोन त्यांना म्हणाला, या वेळेस जरी मी पलीष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबधी मी निष्पाप राहीन.

4शमशोन गेला आणि त्याने जाऊन तिनशे कोल्हे पकडले, आणि प्रत्येक जोडीच्या शेपटात शेपूट घालून बांधले. नंतर मशाली घेऊनआणि प्रत्येक जोडीच्या शेपटामध्ये बांधले.

5मग मशाली पेटवून त्याने त्यांस पालिष्ट्यांच्या उभ्या पिकांत सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिक, रचलेल्या सुडयासुध्दा व त्याबरोबर जैतुनाचे मळे जाळले.

6तेव्हां पलिष्ट्यांनी विचारले, हे कोणी केले? नंतर त्यानी म्हटले, तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची बायको घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यानी जाउन तिला व तिच्या बापाला आग लावून जाळले.

7शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे जे केले, त्याचा मी तुमच्याविरूध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.

8नंतर त्याने त्यांना मांडीवर व कटीवर मारले आणि तुकडे तुकडे केले करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली जाऊन आणि उंच कडेच्या एटाम दरीत राहिला.

9मग पलिष्ट्यी बाहेर आले आणि यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांचे सैन्य रचले.

10तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, तुम्ही आम्हावर का हल्ला केला आहे? तेव्हा ते म्हणाले, शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आम्हाशी जसे केले, तसे आम्ही त्याच्याशी करण्यास आलो आहो.

11नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कडेला जाऊन शमशोनाला म्हणाली, पलिष्टी आम्हावर राज्य करतात, हे तुला माहित नाही काय? तर तू आम्हास हे काय केले? शमशोन त्यांस म्हणाला, जसे त्यानी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.

12ते शमशोनाला म्हणाले, आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी खाली आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, म्हणून माझ्याजवळ शपथ घ्या.

13मग त्यांनी त्याला असे सांगितले की नाही, आम्ही तुला फक्त दोरीने बांधू. आणि तुला त्यांच्या हाती सोपवू; आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही. तेव्हा त्यानी नव्या दोन दोरांनी त्याला बांधून खडकातून वर नेले.

14जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्याला भेटून आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या बाहीला बांधलेले दोर जवस जळते तसे झाले आणि दोरी हातातून गळून पडली.

15नंतर त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याने हजार माणसे मारली.

16शमशोन म्हणाला, गाढवाच्या दाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या दाभाडाने मी हजार माणसे मारली.

17जेव्हा शमशोनाने बोलणे संपवल्यावर आपल्या हातांतून ते जाभाड फेकून दिले, यावरून त्या ठिकाणाचे नाव रामाथलेही ठेवले.

18तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वराला हाक मारून म्हटले, तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंतीच्या हाती पडत आहे.

19आणि देवाने लेहीत पोकळ जागा विभाजन करून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो प्याला, त्याला परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरून त्या झऱ्याचे नाव एनहक्कोरे पडले; तो आजपर्यंत लेहीमध्ये आहे.

20शमशोनाने पलिष्ट्यांच्या दिवसात इस्त्राएलाचा न्याय वीस वर्षे केला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran