Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 14 >> 

1नंतर शमशोन खाली तिम्ना येथे गेला, आणि त्याने तिम्नात एक पलिष्टयी मुलगी पाहिली.

2जेव्हा तो माघारी आला त्याने आपल्या बापाला व आईला सांगितले, मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला बायको करून द्या.

3परंतु त्याच्या आई व बाप त्याला म्हणाले, तुझ्या नातेवाइकात किंवा तुझ्या लोकांत कोणी मुली नाहीत काय? म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली बायको करून घ्यायाला जात आहेस? तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले मला ती पसंत पडली आहे,

4परतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापांस हे समजले नव्हते; (कारण त्या वेळेस पलिष्टी इस्त्राएलावर राज्य करत होते)

5यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्नास जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत पोहंचले, आणि तेथे तरूण सिंह आला आणि त्याजवर येऊन गर्जना करू लागला.

6तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताहि त्याने जसा लहान बकरा फाडावा, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांस सांगितले नाही.

7तो खाली गेला आणि जाऊन त्या बाई बरोबर बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, त्याला ती पसंत पडली.

8कांही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहण्यास बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे होता.

9त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेऊन आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आई व बापाजवळ आला आणि त्यांसहि त्यातला काही दिला, आणि त्यानी खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्यांस सांगितले नाही.

10नंतर त्याचा बाप ती बाई जिथे होती तिथे उतरून खाली गेला आणि शमशोनाने तेथे मेजवाणी दिली, कारण तरूण पुरूषांमध्ये तशी रीत होती.

11तिच्या नातेवाईकांनी त्याला पाहिल्यावर लवकरात लवकर त्यानी त्यांचे तीस मित्र त्याच्या बरोबर राहण्यास आणले.

12मग शमशोन त्यांना म्हणाला, आता मी तुम्हास कोडे सांगतो; मेजवाणीच्या सात दिवसात जर तुम्हातील कोणी एक त्याचे उत्तर शोधून आणि मला सांगाल, तर मी तुम्हास तीस तागाचे वस्त्रे व तीस कपड्यांचे संच देईन.

13परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही तर, तुम्ही मला तीस तागाचे वस्त्र व तीस कपड्याचे संच द्यावे. तेव्हा ते त्याला म्हणाले, तुझे कोडे आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.

14तेव्हा तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यातून खाणे बाहेर निघते, तसे बळकटातून गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसांत तर त्यांच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही.

15नंतर सातव्या दिवशी त्यांनी शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हास सांग, नाही तर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या परीवाराला आग लावून जाळून टाकू; तुम्ही आम्हाला गरीब करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?

16तेव्हा शमशोनाची बायको त्याच्या समोर रडत म्हणाली, तुम्ही सर्व केवळ माझा द्वेष करता; मजवर प्रीति करीतच नाही; तू माझ्या लोकांना तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले. नाही. परंतु शमशोन तिला म्हणाला, इथे पहा, मी आपल्या आईबापास सांगितले नाही, तर तुंला कसे सांगू?

17मेजवाणीच्या सात दिवसांपर्यत ती त्याच्याकडे रडत होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला; मग तिने त्या कोड्याचे उत्तर आपल्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.

18आणि सातव्या दिवशी सूर्य मावळल्यापूर्वी त्या नगरातल्या माणसांनी त्याला म्हणाले, मधापेक्षा गोड काय आहे? सिहापेक्षा बळकट काय आहे? तेव्हा शमशोन त्यांस म्हणाला, जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आले नसते.

19नंतर परमेश्वराचा आत्मा अचानकपणे त्याच्यावर सामर्थ्याने आला. शमशोनाने खाली अष्क्लोनास खाली गेला आणि त्याने त्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्यांच्या कोड्याच उत्तर सांगणाऱ्यास ते कपड्याचे संच दिले; त्याला खूप राग आला होता, आणि तो आपल्या बापाच्या घरी गेला.

20आणि त्याची बायको त्याच्या चांगल्या मित्राला देऊन टाकली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran