Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 11 >> 

1गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो इफ्ताह वेश्या स्त्रीचा पुत्र, आणि गिलाद त्याचा पिता होता.

2गिलादाच्या बायकोने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यानी इफ्ताहाला घालविताना म्हटले, आमच्या बापाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण की तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.

3यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशांत जाऊन राहिला; तेव्हां रिकामी माणसे इफ्ताहजवळ मिळून त्याच्या बरोबर चालली.

4मग कांही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्त्राएलाशी लढाई केली.

5जेव्हा अम्मोनी लोक इस्त्राएलाशी लढत असतांना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशांतून परत आणायला गेले.

6तेव्हां ते इफ्ताहाला म्हणाले, तू येऊन आमचा सेनापती असा हो, कां की आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.

7इफ्ताह गिलादाच्या वडिलांस बोलला, तुम्ही माझा द्वेष करून माझ्या बापाच्या घरांतून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटांत असता, माझ्याजवळ कशाला आला?

8तेव्हा गिलादाच्या वडीलानी इफ्ताहाला म्हटले, आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की तू आमच्या बरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गीलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमच्या अधिकारी असा होशील.

9तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडिलांस म्हणाला, जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारे नेले, आणि परमेश्वराने ते माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन की काय?

10तेव्हा गिलादातील वडील जन इफ्ताहास बोलले, जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.

11मग इफ्ताह गिलादाच्या वडिलाबरोबर गेला, आणि त्या लोकांनी आपल्यावर तो अधिकारी व सेनापति असा करून ठेवला; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पांत परमेश्वरापुढे बोलला.

12मग इफताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशांत आमचा देश घेण्यास येत आहेस?

13तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफताहाच्या वकिलांस बोलला, कारण की जेव्हा इस्त्राएल मिसरांतून आले, तेव्हां त्यानी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत माझा देश हिरावून घेतला; तर आता ते देश शांतीने परत दे.

14तेव्हां इफताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.

15आणि त्याला म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्त्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.

16परंतु जेव्हा इस्त्राएल मिसरांतून निघाले, तेव्हां ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले.

17मग इस्त्राएलानी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, तू कृपाकरून आपल्या देशावरून मला जाऊ दे; परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळहि पाठवले, परंतु तोहि मान्य झाला नाही; यास्तव इस्त्राएल कादेशात राहिले.

18आणि त्यानी रानांत चालून अदोम देश व मवाब देश यांस फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून वाब देशास येऊन आर्णोनच्या कांठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे.

19तेव्हां इस्त्राएलानी अमो-यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनांतल्या राजाजवळ वकील पाठवले, आणि इस्त्राएलानी त्याला म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हास आमच्या ठिकाणापर्यत जाऊ दे.

20पण सीहोनाला इस्त्राएलावर विश्र्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाजात तळ धरून इस्त्राएलाशी लढाई केली.

21तेव्हा इस्त्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्त्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्त्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशांत राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.

22असे त्यानी आर्णोनेपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले.

23तर आता इस्त्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्त्राएल याच्यापुढून अमो-यांस घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?

24तुझा देव कमोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर जे वतन आमच्यापुढे ठेवून देतो, ते आम्ही ठेवू.

25तर आता सिप्पोर पुत्र मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्त्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?

26जेव्हा इस्त्राएल हेशबोनांत व त्याच्या गावांत, आणि अरवेरांत व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती कां काढून घेतली नाहीत.

27मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू मजशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्त्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो.

28तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.

29आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनश्शे यात तो चहूकडे गेला, आणि गिलादी मिस्पा त्यात चहूकडे गेला, मग तेथून अम्मोनी लोकाकंडे गेला.

30इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर,

31असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटायाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमर्पण यज्ञ करीन.

32तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरूध्द लढायाला त्याकडे गेला, आणि परमेश्वराने त्याला विजय दिला.

33आणि अरबेरापासून मिन्नीथाजवळ येण्यापर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेलापर्यंत फार मोठा मार दिला; असे आम्मोनी लोक इस्त्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.

34मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरास आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्याला भेटायाला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याची एकुलते एक मुल होत; तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.

35तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, हाय! माझ्या मुली! तू मला दु:खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यात तूहि आहेस! मी परमेश्वरा कडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूध्द वळता येत नाही.

36तेव्हा ती त्याला बोलली, हे माझ्या बापा, तू परमेश्वरा कडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू मजशी सर्वकाही कर; कारण की परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.

37आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, मजसाठी ही गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.

38तेव्हा त्याने म्हटले, जा. असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली.

39मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरूषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्त्राएलांत अशी रित झाली की,

40प्रत्येक वर्षी इस्त्राएलांतल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे वर्णन करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran