Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Habakkuk 1 >> 

1संदेष्टा हबक्कूकला याला मिळालेले देववचन.

2“हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, आणि तू ऐकणार नाही? जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाही!

3तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण आहे व वाद उठतो!

4ह्यास्तव नियमशास्र कमकुवत झाले आहे, आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, कारण दुष्ट न्यायीला घेरतो, त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”

5“इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा! कारण खचित मी तुमच्या दिवसांत अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हांला सांगण्यात येईल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.

6कारण पाहा! मी खास्द्यांची उठावनी करतो, ते भयानक व उतावीळ राष्ट्र आहे. जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहे.

7ते दारून व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात.

8त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद अाहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरूडाप्रमाणे ते उडतात.

9ते सर्व हिंसा करण्यास येतात, त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूंप्रमाणे गोळा करतात!

10म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत! ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात!

11मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”

12“हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.

13तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही. मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तूं का शांत राहतोस?

14तू लोकांना समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे तसे ते आहेत.

15ते त्यांना गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतो. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.

16म्हणून ते आपल्या माश्यांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात. कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते.

17तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांचा कत्तल करीतच राहणार काय?”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Habakkuk 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran