Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Galatians 2 >> 

1नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेमेस वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले.

2मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो, आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयांत गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकान्ती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.

3पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.

4आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.

5शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.

6तरी पण, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव माणसाचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही.

7तर उलट सुंता झालेल्यांना शुभवर्तसान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्यांत सुवार्ता सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.

8कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाहि परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.

9आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहो हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.

10मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती.

11पण त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्याला आडवा आलो, कारण तो दोषीच होता.

12कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो परराष्ट्रीयांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकास भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.

13तेव्हा तसेच दुसर्‍या यहूद्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.

14पण मी जेव्हा बघितले की,शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, , तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, ‘तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?’

15आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही.

16तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.

17पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही.

18कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला अपराधी ठरवीन.

19कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे.

20मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.

21मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही; कारण नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Galatians 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran