Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ephesians 3 >> 

1या कारणासाठी मी, पौल तुम्हा परराष्ट्रीयासाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे.

2देवाची कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही एेकले असेल;

3जसे मला प्रगटीकरणाद्वारे मला सत्याचे रहस्य कळवले गेले मी ते यापुर्वी थोडक्यात लिहिले होते.

4जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या सत्य रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हाला समजता येईल,

5ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना सांगण्यात आले नव्हते.

6हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.

7देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो.

8जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,

9आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादिकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकास मी प्रकट करावे.

10यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे बहुत प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.

11देवाच्या सर्वकालच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.

12ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे.

13म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही माघार घेऊ नये. कारण हे क्लेश आमचे गौरव आहेत.

14या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,

15ज्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.

16त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हाला असे द्यावे, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.

17विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,

18यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.

19म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे.

20आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्थ आहे,

21त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ephesians 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran