Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ephesians 1 >> 

1देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून, इफिसात जे देवासाठी वेगळे केलेले आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वासूपणे भरवसा ठेवून आहेत त्यांना,

2देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांती असो.

3स्वर्गीय स्थानातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाला व पित्याला धन्यवाद असोत.

4देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.

5येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्यासाठी आम्हाला दत्तक घेण्यासाठी पुर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे यासाठी केले कारण की, त्याची इच्छा पुर्ण करण्यात त्याला आनंद होता.

6त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हाला फुकट दिली.

7त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे, त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.

8त्याची ही कृपा आम्हाला सर्व ज्ञानात आणि समजबुध्दीत विपुलतेने पुरवण्यात आली आहे.

9देवाने ख्रिस्ताच्या ठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे

10जेणेकरून त्याची ही योजना पूर्ण होेण्यासाठी काळाची पूर्तता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणिल.

11ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो

12ज्या आम्ही ख्रिस्तावर आधीच आशा ठेवली त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.

13ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.

14देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीयजनाच्या खडंणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.

15यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि पवित्र जनांवरील तुमच्या प्रीतीविषयीही ऐकले,

16मीही तुमच्यासाठी देवाचे आभार मानण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबविले नाही.

17मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;

18म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची निश्चीतता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे,

19आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आेळखून घ्यावे.

20त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.

21त्याने त्याला सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच ठिकाणी ठेवले.

22देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवले, आणि त्याला सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले,

23हेच त्याचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, तीच तो मंडळीला देतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ephesians 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran