Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 9 >> 

1मिसर देशामधून इस्त्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला,

2“इस्त्राएल लोकांना वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.

3ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्यासमयी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”

4मग मोशेने इस्त्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले.

5तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्त्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्त्राएल लोकांनी सर्वकाही केले.

6त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी ते मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.

7ते माणसे त्याला म्हणाले, “एका मृत माणसामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्त्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हाला दूर कां ठेवत आहेस?”

8मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”

9मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

10तू इस्त्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा;

11त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा.

12त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत.

13परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वर्षाच्या केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.

14जर तुमच्यामध्ये एखाद्या विदेशी माणूस राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.

15ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यत अग्नीसारखा दिसला.

16अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.

17जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्त्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत.

18परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्त्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत.

19जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्त्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.

20काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवास निघत.

21काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर वरती गेला की, ते एकसारखा प्रवास करीत असत.

22जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्त्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासाला निघत.

23परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Numbers 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran