Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 30 >> 

1मोशे इस्त्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.

2जर एखाद्याने परमेश्वराला नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.

3एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.

4जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.

5पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील.

6आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.

7तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.

8पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.

9विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.

10आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वराला काही नवस केला असेल,

11तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.

12पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.

13लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.

14नवरा यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.

15पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.

16परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Numbers 30 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran