Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 24 >> 

1इस्त्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.

2बलामने रानाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्त्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.

3त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, बौराचा मुलगा बलाम, ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.

4जो देवाचे शब्द ऐकतो अणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.

5हे याकोबा तुझे तंबू, हे इस्त्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!

6खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले, नदीकाठी लावलेल्या बागेसारखे, परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.

7पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.

8देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. त्यांना रानटी बैलासारखी शक्ति आहे. तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. तो त्यांची हाडे तुकडे तुकडे करील. तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.

9तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्याला उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.

10बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.

11तर आता मला सोडून आणि घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेहि इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”

12बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,

13बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.

14तर आता पाहा. मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्त्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.

15बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.

16हा संदेश जो कोणी देवाकडून वचन ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.

17मी त्याला पाहीन, पण तो आता इथे नाही. मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा बाहेर येईल, आणि इस्त्राएलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.

18नंतर अदोम इस्त्राएलाचे वतन होईल, आणि सेईरही आपल्या इस्त्राएली शत्रूंचे वतन होईल, ज्याला इस्त्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.

19याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.

20नंतर बलामाने अमालेकीकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”

21नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.”

22“तरीसुद्धा काइन नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.”

23नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”

24कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील; ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबेर जिंकून घेतील. पण त्यांचासुद्धा नाश होईल.

25नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Numbers 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran