Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 40 >> 

1परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,

2“तू सर्वशक्तीमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?

3मग ईयोबने देवाला उत्तर दिले तो म्हणाला,

4मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.

5पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.

6नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:

7तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.

8मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.

9तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तिशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?

10तू स्वत:ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.

11तूझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांना शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.

12होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांना जागच्या जागी चिरडून टाक.

13त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.

14मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.

15तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.

16त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.

17त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.

18त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.

19बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी (देवाने) निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.

20डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.

21तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.

22कमळाचे झाड त्याला आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.

23नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.

24त्याला कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्याला सापळ्यात अडकवू शकेल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 40 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran