Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 20 >> 

1नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला,

2“माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे.

3तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे.

4तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, जेव्हा देवाने मणुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून,

5दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.

6त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, आणि त्याचे मस्तक ढगांपर्यत पोहोचू शकेल.

7परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’

8तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.

9ज्या लोकांनी त्याला पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,

10दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट माणसाचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.

11तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.

12दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.

13दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.

14परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल.

15त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, देव त्याला ती पोटातुन ओकायला भाग पाडेल.

16तो फुरशाचे विष चोखील, सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.

17नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही.

18त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.

19कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यानी बळकावली.

20कारण त्याला माहीती आहे त्याला कोणतेच समाधान नसते. म्हणून त्याला आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही.

21तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही.

22जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील.

23दुष्ट माणसाने त्याला हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल.

24दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.

25पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील आणि तो भयभीत होईल.

26त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.

27आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.

28त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल.

29देवाकडून नेमलेला हा दुष्टमाणसाचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran