Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 17 >> 

1“माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे.

2खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहते.

3मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तुच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?

4तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस.

5जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलांचे डोळे जातील.

6त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात.

7दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.

8यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.

9पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिका अधिक सामर्थ्यवान होत जाईल.

10पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही.

11माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.

12माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात.

13थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.

14जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’

15तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?

16माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हाला विसावा मिळते.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran