Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 15 >> 

1नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,

2“शहाणा माणूस, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वार्याने स्वतःला भरेल का?

3तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?

4खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.

5तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.

6मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात

7तुच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?

8तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?

9आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हाला अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?

10केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.

11देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?

12तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,

13तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.

14मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?

15पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.

16असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुध्द आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?

17माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो.

18विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.

19ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात त एकटेच रहात होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.

20दुष्ट माणसाचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.

21भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.

22अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.

23ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.

24संकटे आणि दुख त्याला भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.

25कारण त्याने देवाच्या विरुद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तीमान देवाच्या विरुद्ध तो गर्वाने वागत आहे.

26हा दुष्ट माणूस ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,

27त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,

28आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते माती चे ढीग होण्यास तयार आहे.

29तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्याला सोडून जाईल.

30त्याची काळोखापासून सुटका नाही, आगीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.

31निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत:चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.

32आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.

33न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.

34अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.

35ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran