Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 11 >> 

1नंतर नामाथीच्या सोफरने उत्तर दिले आणि तो म्हणाला,

2“शब्दांच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे? सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का?

3तुझा गर्वाच्या बडबडीने दुसरे चूप होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजीत करणार नाही काय?

4तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे, आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे.

5अहो, परंतु, देवाने बोलावे आणि तुझ्या विरुद्ध त्याने ओठ उघडावे.

6तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे.

7तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तीमान देवाला समजणे अशक्य आहे.

8त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?

9तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.

10फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले, जर त्याने एखाद्याचा न्याय करावयाचे ठरवले तर त्याला कोण अडवू शकेल?

11त्याला चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याला समजत नाही काय?

12परंतु मूर्ख माणसाला शाहाणपण समजत नाही, त्यांना समजेल रानटी गाढव माणसाला जन्म देईल.

13परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.

14तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.

15तरच तू निश्चीत त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील.

16तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.

17भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल.

18तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील.

19तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील.

20वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran