Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 29 >> 

1जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, पण तरी आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.

2जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.

3ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो.

4राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.

5जो कोणी माणूस आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.

6दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आणि आनंदित होतो.

7नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.

8थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.

9जेव्हा सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, तो रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते.

10रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळांच्या जिवाचा शोध घेतात.

11मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो पण शहाणा माणूस तो आवरून धरतो आणि शांत राहतो.

12जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.

13गरीब माणूस आणि जुलूम करणारा एकत्र मिळतात; आणि त्या दोघांचे डोळे परमेश्वर प्रकाशित करतो.

14जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.

15छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेल मुल आपल्या आईला लाज आणते.

16जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण जे कोणी चांगले करतात त्यांना त्यांचे पतन पाहावयास मिळते.

17आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जिव आनंदित करील.

18जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.

19दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्याला समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही.

20कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्याला पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.

21जर कोणी आपल्या दासाला बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.

22रागावलेला मनुष्य संकटे आणतो आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.

23गर्व मनुष्याला खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.

24जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो आपल्या जिवाचा द्वेष करतो; तो शाप ऐकतो आणि कांहीच म्हणत नाही.

25मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.

26पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.

27अन्यायी मनुष्य न्यायींना वीट असा आहे, आणि मार्गात सरळ असलेला मनुष्य दुष्टाला वीट असा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 29 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran