Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 27 >> 

1उद्याविषयी बढाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही.

2दुसऱ्याने तुझी स्तुती करावी आणि तुझ्या स्वतःच्या मुखाने नाही; परक्याने तुझी स्तुती करावी, तुझ्याच ओठांनी नव्हे.

3दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते, आणि मूर्खांचे डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते.

4क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?

5गुप्त प्रेमापेक्षा उघड निषेध चांगला आहे.

6मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.

7जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्याला मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.

8जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.

9सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदित करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहेत.

10स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.

11माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदित कर, नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देईन.

12शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते.

13जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव.

14जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो, तो त्याला शाप असा गणला जाईल.

15पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके भांडखोर बायको सारखीच आहेत

16तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे.

17लोखंड लोखंडाला धारदार करते; तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो.

18जो कोणी अंजिराचे झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल.

19जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जश्याचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.

20मृतलोक आणि विनाशस्थान यांची कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे डोळे कधी तृप्त होत नाही.

21रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.

22जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.

23तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.

24संपत्ती कायम टिकत नाही. मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय?

25गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.

26वस्त्रासाठी कोकरे आहेत आणि बकरी शेताचे मोल आहे.

27बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran