Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 24 >> 

1दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.

2कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.

3सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.

4ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.

5शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.

6कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.

7मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो.

8जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो लोक त्याला योजनेचा गुरू म्हणतात.

9मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा माणसांना तिटकारा येतो.

10जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.

11ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर नेत असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.

12जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्याला हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्याला माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?

13माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.

14त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.

15अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!

16कारण जर कोणी माणूस चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.

17तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदित होऊ देऊ नको.

18उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.

19जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको आणि दुष्टांचा मत्सर करु नको.

20कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.

21माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करतात आहेत त्यात सामील होऊ नकोस.

22कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?

23हेहि शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.

24जो कोणी अपराधी माणसाला म्हणेल, तू योग्य आहेस तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.

25पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्याला आनंद होईल आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.

26जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.

27तू बाहेर आपले तयार कर आणि आपणासाठी शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.

28निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्षी देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.

29“त्याने जसे मला केले तसे मी त्याला करीन. मी त्याला त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.

30मी आळशी माणसाच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.

31तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.

32मी ते बघितले आणि त्याचा विचार करु लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.

33“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”

34आणि दारिद्र्य लुटारूसारखे आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran