Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 22 >> 

1चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.

2गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.

3शहाणा मनुष्य संकट येताना पाहून आणि स्वतः लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.

4परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.

5कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.

6मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्याला दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.

7श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.

8जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो आणि त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.

9जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.

10निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटेल, मतभेद आणि अप्रतिष्ठा बंद पडतील.

11ज्याला मनाची शुद्धता आवडते आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.

12परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.

13आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”

14व्यभिचारी स्त्रीयांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यात पडतो.

15बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.

16जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोहि गरीब होईल.

17ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.

18कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, जर ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील.

19परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुलासुद्धा आज शिकवली आहेत.

20मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?

21ह्या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्याला विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?

22गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.

23कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.

24जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करु नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.

25तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.

26दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होऊन आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.

27जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?

28तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे तो दगड दूर करू नकोस.

29जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्याला तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहिल; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran