Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 20 >> 

1द्राक्षारस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडणखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.

2राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्याला राग आणतो तो आपल्याच जीवाविरुद्ध पाप करतो.

3जो कोणी भांडण टाळतो त्याला आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.

4आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी तो पिक शोधेल पण त्याला काहीही मिळणार नाही.

5मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.

6बरेच मनुष्ये तो विश्वासू आहे याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या मनुष्याला कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.

7जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्याला अनुसरतात ते सुखी होतात.

8जो कोणी राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.

9मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?

10भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे परमेश्वराला त्या दोन्हीचा तिरस्कार आहे.

11तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.

12ऐकणारे कान आणि बघणारे डोळे हे दोन्ही परमेश्वरानेच केलेत.

13झोपेची आवड धरू नकोस किंवा धरलीस तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.

14विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.

15तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्ने आहेत.

16जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीस जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.

17कपटाची भाकर गोड लागते, पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल.

18सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात आणि केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.

19लावालवी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो आणि म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.

20जर एखादा माणूस आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.

21सुरवातीला उतावळीने मिळविलेल्या संपत्तीचा शेवट कमी चांगला होईल.

22मी चुकीच्या बदल्यात तुला भरून देईल असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पहा आणि तो तुझे रक्षण करील.

23असमान वजनाचा परमेश्वराला तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही.

24मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?

25हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर आणि मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय.

26सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.

27मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.

28कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वासनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो.

29तरुण माणसाचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौदर्य आहे.

30जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Proverbs 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran