Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Amos 3 >> 

1इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्यावीरूद्ध जे वचन सांगितले ते ऐका,

2“पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून, मी फक्त तुम्हांला निवडले आहे. म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हांला शिक्षा करीन.”

3दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय?

4शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरून सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुर करेल काय?

5जाळ्यावाचून पक्षी भूमिवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?

6रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?

7खरोखर तो आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.

8सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहील?

9अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा, आणि त्यात कीती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.

10परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाही.”

11यास्तव परमेश्वर म्हणतो: “त्या देशाला शत्रू घेरतील, तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल, आणि तुझे महाल लुटले जातील.”

12परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय, किंवा कानाचा तुकडा, त्याचप्रकारे इस्राएली लोक जे शोमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा खाटेच्या रेशमी गाद्यांवर बसतात ती वांचवली जातील.”

13सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः “ऐका, आणि याकोबाच्या घराण्या विरूध्द साक्ष द्या.

14कारण ज्या दिवसांत मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन तेव्हा मी बेथेलच्या वेदीही नष्ट करीन, वेदीची शिंगे तोडली जातील आणि ती भूमीवर पडतील.

15हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Amos 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran