Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Amos 1 >> 

1तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसांत, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्याला मिळाली ती ही आहेत.

2तो म्हणाला: सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल, तो यरुशलेमेतून आपला शब्द उच्चारील. मेंढपाळांची कुरणे शोक करतील, आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.

3परमेश्वर असे म्हणतो, “कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे, मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे.

4मी हजाएलच्या घरात अग्नि पाठवीन आणि ती अग्नि बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकील.

5मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकणार, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यातून राहणारा यांचा पराभव करील. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” परमेश्वर असे म्हणतो.

6आणि परमेश्वर असे म्हणतो , “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे, त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांना गुलाम म्हणून नेले, ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.

7म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि ही अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.

8मी अश्दोमध्ये राहणाऱ्या मनुष्याला आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्याला नष्ट करीन. एक्रोनाच्या विरूद्ध मी माझा हात चालवीन. आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.” परमेश्वर देव असे म्हणतो.

9परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे , मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांना अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.

10म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि ती त्यांचे किल्ले नष्ट करील.”

11परमेश्वर असे म्हणतो, “अदोमच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.

12म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”

13परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापंबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे , मी शिक्षा करण्यारासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.

14म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन, त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरडी होत असतांना, आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील.

15आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.” असे परमेश्वर म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Amos 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran