Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Timothy 2 >> 

1माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.

2माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांना सोपवून दे.

3ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.

4सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.

5जर कोणी मल्ल युध्द करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुगुट मिळत नाही.

6कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.

7जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल.

8माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मेलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.

9कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःखसहन करत आहे, येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे वचन बांधले गेले नाही.

10ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.

11हे वचन विश्वसनीय आहे की, ''जर आम्ही त्याच्यासह मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू

12जर आम्ही दुःखसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुध्दा करू जर आम्ही त्याला नाकारले, तर तोही आम्हाला नाकारील

13जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही''.

14लोकांना या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुध्द करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.

15तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.

16पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतो.

17आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत,

18ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.

19तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.”

20मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात.

21म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुध्द करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.

22पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुध्द अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.

23परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.

24देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.

25जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.

26आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुध्दीवर येतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Timothy 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran