Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 15 >> 

1यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असे.

2रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे मी इस्राएलच्या अमुक वंशातला.

3तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.

4अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करु शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.

5अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्याला आभिवादन करु लागला तर अबशालोम त्या माणसाला मित्रासारखी वागणूक देई, आपला हात पुढे करून तो त्याला स्पर्श करी त्याचे चुंबन घेई.

6राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली.

7पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वराला नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ दे.

8अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमला नेले तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो.

9तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले अबशालोम हेब्रोन येथे आला.

10पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांना कळवले रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा.

11अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरूशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती.

12अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.

13एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.

14तेव्हा यरूशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.

15तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.

16आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.

17राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले

18त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करथी, पलेथी आणि सहाशे गित्ती राजामागोमाग चालत गेले.

19गथ येथील इत्तयला राजा म्हणाला तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे.

20तू कालच येऊन मला मिळालास आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.

21पण इत्तय राजाला म्हणाला परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही आता जगणे मरणे तुमच्याबरोबरच.

22दावीद इत्तयला म्हणाला मग चल तर किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-माणसांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला.

23सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्व जण वाळवंटाकडे निघाले.

24सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा करारकोश घेऊन निघाले होते त्यानी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला यरुशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता.

25राजा दावीद सादोकला म्हणाला, हा देवाचा पवित्र कोश यरूशलेमला परत घेऊन जा परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल यरूशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.

26पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.

27पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा.

28हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.

29तेव्हा देवाचा पवित्र करारकोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरूशलेमला परतले आणि तिथेच राहिले.

30दावीद शोक करत जैतूनच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.

31एकाने दावीदाला सांगितले अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली तो म्हणाला, परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.

32दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अकर् त्याला भेटायला आला त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.

33दावीद हूशयला म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यात आणखी तुझा भार.

34पण तू यरूशलेमला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अबशालोमला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो पण आता तुमची सेवा करीन.

35सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.

36सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.

37तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरूशलेममध्ये आला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran