Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Corinthians 13 >> 

1मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिध्द होईल.

2ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते, आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही.

3कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.

4कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.

5तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही, म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.

6मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल.

7आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नाही, पण आम्ही पसंतीस न उतरलेले असलो तरी तुम्ही चांगले ते करावे.

8कारण आम्ही सत्याविरुध्द काही करत नाही, तर सत्यासाठी करतो.

9जेव्हा आम्ही दुर्बळ आहो व तुम्ही बलवान आहा तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.

10एवढ्याकरता दूर असताना मी ह्या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.

11शेवटी, बंधूंनो , आनंद करा!तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा; आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.

12पवित्र अभिवादाने एकमेकांना सलाम करा.

13तुम्हाला सर्व पवित्रजन सलाम सांगतात.

14प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Corinthians 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran