Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Corinthians 10 >> 

1पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.

2माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्या विरूध्द कडक होण्याची गरज पडू नये.

3कारण, आम्ही देहात चालणारे असूनही अाम्ही देहस्वभावाप्रमाणे युध्द करत नसतो.

4कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत_ चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.

5तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूध्द उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.

6आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिध्द आहोत.

7डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.

8कारण, प्रभूने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;

9म्हणजे मी पत्रांद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये.

10कारण ते म्हणतात की, “त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे एेकण्याच्या लायकीचे नसते.“

11अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.

12जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही.

13आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हाला लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

14कारण जणू, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे, आम्ही मर्यादेबाहेर जात नाही. कारण, आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहो.

15आम्ही मर्यादा सोडून दुसर्‍यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हाला आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.

16म्हणजे, दुसर्‍यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे

17“पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.“

18कारण स्वतःची प्रशंसा करणारा पसंतीस उतरत नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच पसंतीस उतरतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Corinthians 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran