Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 John 1 >> 

1जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे, त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.

2ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हाला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हाला प्रकट केले गेले.

3आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.

4तुमचाआमचा आनंद पूर्ण व्हावा.म्हणून आम्ही हे लिहीत आहोत.

5जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे आणि तोच तुम्हाला घोषित करीत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.

6जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.

7पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.

8जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.

9जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे.म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील.

10जर आम्ही म्हणतो की, आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्याला लबाड ठरवतो. आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 John 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran