Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Timothy 4 >> 

1आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

2ज्या माणसांची सदसदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्या कडे लक्ष देेतील.

3ते लोकांना लग्न करण्यास मना करतील व जी अन्ने विश्वासणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.

4तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीहि वर्ज्य नाही.

5कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.

6जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

7परंतु अमंगळपणाच्या आणि म्हाताऱ्या बायकांच्या व्यर्थ कहाण्या टाकून दे आणि तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.

8कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

9हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे.

10याकरता आम्ही श्रम व खटपट करतो, कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.

11ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव.

12कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, [आत्म्यात] विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो.

13मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, ह्याकडे लक्ष्य लाव.

14तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस भविष्यवाद्याच्या द्वारे देण्यांत आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको जे.

15या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.

16आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Timothy 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran