Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Timothy 2 >> 

1तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.

2आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्यां सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.

3कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,

4त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.

5कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.

6त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.

7आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.

8म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडन सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.

9त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे, तर सभ्य वेशाने, विनयाने, व मर्यादेने, सुशोभित करावे.

10तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.

11स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे.

12मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे.

13कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा.

14आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.

15तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास व प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Timothy 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran