Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 12 >> 

1किशाचा मुलगा शौल याच्यामुळे दावीद सिकलागला, राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.

2धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलचे नातेवाईक होते.

3अहीएजर हा त्याच्यांतला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे मुलगे त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू.

4गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.

5एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या

6एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरही,

7तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.

8गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.

9गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.

10मिश्मन्ना चवथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.

11अत्तय सहावा, एलीएल सातवा,

12योहानन आठवा, एलजाबाद नववा,

13यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.

14हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता.

15वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.

16बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.

17दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”

18अमासय याच्यावर आत्म्या आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, जो कोणी तुला साहाय्य करील त्यालाहि शांती असो. तुला मदत करणाऱ्यालाहि शांती असो कारण तुझा देव तुला मदत करत आहे. तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.

19मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”

20तो जेव्हा सिक्‌लागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.

21लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.

22देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.

23आणि देवाच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले.

24यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.

25शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.

26लेवीच्या कुळातून चार हजार सहाशे शूर वीर होते.

27अहरोनच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.

28सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या बापाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.

29बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.

30एफ्राइमच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले होते. वीस हजार आठशे शूर सैनिक होते.

31मनश्शेच्या वंशातील निम्मे म्हणजे अठरा हजार लोक आले. दावीदाला राजा करण्यासाठी म्हणून त्यांना नावानिशी बोलवून आणले होते.

32इस्साखारच्या घराण्यातील दोनशे जाणती, जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.

33जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.

34नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.

35दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.

36आशेर मधले चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.

37यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.

38हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.

39त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्न पुरवठा देऊन पाठवले होते.

40याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षारस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran