Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Peter 5 >> 

1तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.

2तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; द्रव्यलोभासाठी नाही, पण उत्सुकतेने; करा

3आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा.

4आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार मिळेल.

5तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा. आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.

6म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की, त्याने तुम्हाला योग्यवेळी उंच करावे.

7तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.

8सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावेे म्हणून शोधीत फिरतो.

9तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे रहा. कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत.

10पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.

11त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.

12मी ज्या सिल्वान ला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्याहाती तुम्हाला थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. यात तुम्ही स्थिर रहा.

13बाबेल येथील, तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम पाठवत आहे; आणि माझा मुलगा मार्क हाही पाठवत आहे

14प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Peter 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran