Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 19 >> 

1परमेश्वर असे म्हणतो, “ जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.

2नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तीथे घोषीत कर.

3तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांना सांग, ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा! मी ह्या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे झिणझिणतील.

4मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळवीले आहे.माहित नसलेल्या अशा परक्या दैवतांना त्यांनी ह्या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पुर्वजांनी आणि यहूदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे.

5यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली त्यात ते आपल्या मुलांना अग्नीत होमाअर्पण आपली मुले जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण. आणि असे कधीही माझ्या मनातही आले नाही.

6यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.

7येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग कराऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्या आधी मी त्यांना तरवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल.

8ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक तीच्या पीडा पाहून माना हलवतील व फुत्कार सोडतील, मी त्या नगरीला नाश आणि फुत्काराची गोष्ट अशी करीन.

9ते स्वत:च्याच मुलांना आणि मुलींना खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असे मी त्यांना करीन.

10“मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.

11आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, ‘तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.

12परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातल्या राहणरे, च्यांच्या बाबतीत मी असेच करीन. मी ह्या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.

13‘यरुशलेममधील घरे आणि राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयअर्पणे केली.”

14मग परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला.

15“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो: पाहा! ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर सर्व अरिष्ट जे मी बोललो ते आणीन. कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.



 <<  Jeremiah 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran