Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 113 >> 

1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.

2परमेश्वराचे नाव आता आणि येथून पुढे सदासर्वकाळ दोनही धन्यवादित असो.

3सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.

4सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो,आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचवो.

5आमच्या देवासारखा कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,

6जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो?

7तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.

8अशा करता की,ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.

9अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.



 <<  Psalms 113 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran