Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 19 >> 

1त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वात दूर भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम येथील एक बाई, उपपत्नी करून घेतली होती.

2परंतु त्याची उपपत्नी त्याच्याशी अविश्वासू होती, आणि ती त्याला सोडून आणि यहुदातील बेथलेहेमात आपल्या बापाच्या घरी परत गेली तेथे चार महिने राहिली.

3तेव्हां तिचा नवरा उठून तिचे मन वळवून तिला माघारे आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्याला आपल्या बापाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले, त्याला भेटून तो आनंदित झाला.

4त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या बापाने त्याला फार आग्रह केला; म्हणून तो त्याजवळ तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिली.

5मग चवथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जाण्यास तयार झाला, परंतु त्या मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हणाला, तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.

6त्या दोघांनी एकत्र खाली बसून खाणे आणि पिणे केले; नंतर त्या मुलीच्या बापाने म्हटले. कृपाकरून तू एक रात्र राहण्यास तयार हो, आणि चांगला समय घालव.

7जेव्हा लेवी लवकर जाण्यास उठला, तरूण मुलाच्या बापाने त्याला राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली.

8नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, परंतु त्या मुलीच्या बापाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यत थांब. तेव्हां त्या दोघांनी जेवण केले.

9जेव्हा लेवी आपली उपपत्नी व आपला नोकर जायला उठली, त्याचा सासरा त्याला बोलला, आतां पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही या रात्री राहा; पाहा, दिवस थोडा राहिला, येथे वस्ती करून आपल्या मनाला सुख होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरास जा.

10परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबुस म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला; तेव्हां त्याच्या बरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी त्याच्या बरोबर होती.

11जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हां दिवस फार उतरला होता, यास्तव त्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, चल, आपण बाजूला वळून यबूस्यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यात रात्र घालवू.

12त्याचा धनी त्याला म्हणाला, जे इस्राएलाचे लोक नाहीत परक्याच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.

13लेवीने आपल्या नोकराला सांगितले, चल, आपण त्या जागेपैकी एका ठिकाणी पोहचू गिबा किंवा रामा आणि त्यांत रात्र घालवू.

14मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामीनाचा प्रदेश जो गिबा त्याजवळ आल्यावर सूर्य मावळला.

15तेव्हां गीब्यांत वस्ती करायाला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगरच्या चौकात बसला, परंतु त्यांस रात्री राहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही.

16परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा माणूस शेतांतून आपल्या कामावरून येत होता; तोही माणूस एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यांत प्रवासी होता आणि त्या ठिकाणांतली माणसे बन्यामिनी होती.

17त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू माणूस पाहिला; तेव्हां तो म्हातारा माणूस बोलला, तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?

18तेव्हां तो त्याला बोलला, आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून एफ्राइम डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्याच्या घरात घेत नाही.

19आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि मजसाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरूण नोकर त्यासाठी भाकर व द्राक्षारस आहे, कोणत्याहि गोष्टीची उणीव नाही.

20तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने त्यास अभिवादन केले, तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजेची काळजी घेईल. फक्त चौकात रात्र घालवू नको.

21तेव्हा त्या माणसाने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यानी आपले पाय धुऊन खाल्ले व प्याले.

22ते आनंदात वेळ घालवत असताना, तेव्हा त्या नगरांतल्या दुष्ट लोकांनी, घराला वेढून दारावर ठोकून मारले. त्या घरधन्याला, म्हाताऱ्या माणसाला म्हणाले की जो माणूस तुझ्या घरात आला आहे, त्याल तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.

23मग तो माणूस, त्या घराचा धनी बाहेर त्याच्यांजवळ जाऊन त्यांस बोलला, नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा माणूस माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हे दुष्टपण करू नका.

24पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी त्यांना आता बाहेर आणतो; मग तुम्ही त्यांच्यावर अब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तीच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.

25तथापि ती माणसे त्याचे ऐकायाला तयार झाली नाहीत; तेव्हां त्या माणसाने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यानी तिच्या सोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.

26तेव्हा पहाटच्या वेळेस ती बाई येऊन जेथे आपला धनी होता, त्या माणसाच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली.

27जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबऱ्यावर होते.

28तेव्हा लेवीने तिला म्हटले, उठ, म्हणजे आपण जाऊ. परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.

29मग आपल्या घरी पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपली उपपत्नी घेऊन तिला कापले, एकेक अवयव कापून बारा तुकडे केले, मग ती इस्राएलांच्या प्रत्येक ठिकाणी संपूर्ण पाठविली.

30नंतर असे झाले की त्या प्रत्येकाने पाहिले, त्यानी म्हटले, मिसर देशांतून इस्राएल लोक आली, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखे झाले नाही, आणि दृष्टीस पडले नाही; यावर तुम्ही आपले चित्त देऊन विचार करा, आणि बोला.



 <<  Judges 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran