Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Habakkuk 3 >> 

1संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः

2परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तु आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये त्या माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दयाकरण्याचे आठव.

3तेमानहून देव येत आहे, पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.

4त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि तेथे त्याने त्याचे सामर्थ्य ठेवले.

5रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघून चाले.

6तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला. सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या, त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.

7कूशानचे तंबू संकटात असलेली मी पाहिली, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.

8परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? कारण तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास.

9तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तु आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला). तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.

10पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये पिळले! जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे. त्याने आपला हात उंचावला आहे.

11चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दुर गेले आहेत!

12तु रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.

13तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला अाहे, सेला!

14ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हाला पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनीकांच्या डोक्यात भोसकले, गरीब माणसाला एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती.

15पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.

16मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझे हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकानी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.

17जरी अंजिराच्या झाडांना फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आली नाही, जैतूनाच्या झाडाची उपज जरी निराश झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाईगुरे उरली नसली,

18तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाच्या देवाजवळ उलालस करीन.

19प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.



 <<  Habakkuk 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran