Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezra 1 >> 

1यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे म्हणून कोरेश पारसाचा राजा असतांना त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.

2पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरुशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.

3त्याच्या लोकांतला जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव त्याच्यासोबत असो. त्याने यहूदातील यरुशलेमास वरती जाऊन, जो इस्राएलाचा देव, व जो यरुशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.

4आणि त्याभागातील जे कोणी वाचलेले आहेत, तो ज्याठिकाणी राहत आहेत, त्यांनी यरुशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन त्याचप्रमाणे सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा पुरवठा करावा.

5तेव्हा यहूदा व बन्यामीनाच्या घराण्यातील वडीलांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरुशलेमेला जाण्यास उठले.

6त्यांच्या सभोवती रहात होते त्यांनी, त्यांना सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.

7शिवाय नबुखद्रेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील पात्रे यरुशलेमाहून काढून त्याने आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवल्या होत्या, त्या राजा कोरेशाने बाहेर काढल्या.

8पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती त्या दिल्या. त्याने त्या काढून शेशबस्सर या यहूदाच्या अधिकाऱ्याला मोजून दिल्या.

9त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याची ताटे, एक हजार चांदीची ताटे, एकुणतीस दुसरी ताटे,

10तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार अधिक दुसऱ्या वस्तू

11सोन्याच्या व चांदीच्या सर्व मिळून पाच हजार चारशे वस्तू होत्या. बाबेलमधून कैदी यरुशलेमेला परत आले त्यावेळी शेशबस्सराने या सर्व वस्तू आणल्या.



 <<  Ezra 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran