Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ephesians 4 >> 

1म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा.

2सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि सहनशीलतेने एकमेकांना प्रीतीने स्वीकारा.

3शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा.

4एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास पाचारण केले आहे.

5एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,

6एक देव आणि सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.

7ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान दिलेले आहे.

8वचन असे म्हणते. “जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युध्दकैदयास कैद करून नेले, आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.,

9( आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुध्दा उतरला असाच होतो की नाही?)

10जो खाली उतरला तोच पुरूष वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या.

11आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.

12त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्रजनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या.

13आपण सगळे देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या ऐक्यात, प्रौढ मनुष्यपणात, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणात पोहोचेपर्यंत दिले आहेत.

14ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणारे होऊ नयेत

15त्याऐवजी आपण प्रीतीने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहेे, ख्रिस्त

16ज्यापासून विश्वासणाऱ्यांचे सर्व शरीर जुळवलेले असते आणि ते प्रत्येक सांध्याने एकत्र बांधलेले असते आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, अापली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागाची वाढ होते.

17म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.

18त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.

19त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुध्दतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे.

20परंतु तुम्ही ख्रिस्ताबद्दल अशाप्रकारे शिकला नाही.

21जर तुम्ही त्याच्याबद्दल एेकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल,

22तर तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,

23यासाठी तुम्ही अापल्या मनोवृतीत नवे केले जावे,

24आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे.तो धारण करावा.

25‘म्हणून लबाडी सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे. कारण अापण एकमेकांचे अवयव आहोत.

26तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.

27सैतानाला संधी देऊ नका.

28जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.

29तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याएेवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल.

30आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.

31सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.

32एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.



 <<  Ephesians 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran