Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ephesians 2 >> 

1आणि तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे मेला होता.

2ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान त्याला अनुसरुन, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांमध्ये कार्य करणाऱ्या आत्म्याच्याप्रमाणे चालत होता..

3आम्ही सर्व यापूर्वी ह्या अविश्वासणाऱ्या मध्ये आपल्या शारीरीक दुष्टवासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो, व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची मुले होतो.

4पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.

5आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.

6आणि आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या आसनावर बसविले.

7यासाठी की, ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हांवर जी दया आहे, तिच्या येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी.

8कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे,

9आपल्या कामामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.

10कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी जे देवाने अारंभीच याेजून ठेवले होते, निर्माण केले गेले. आम्ही त्यामध्ये चालावे.

11म्हणून आठवण करा, एके काळी तुम्ही देहाने परराष्ट्रीय होता, आणि ज्यांची देहाची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.

12त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवविरहित असे जगात होता.

13पण आता, येशू ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.

14कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि परराष्ट्रीय या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हाला एकमेकांपासून दुभागणारी वैराची, मधली आडभिंत पाडून टाकली.

15त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून शांती करावी.

16त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात त्या दोघांचा देवाबरोबर समेट करावा.

17येशू आला आणि त्याने जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला व जे तुम्ही जवळ होता त्या तुम्हालाही शांतीची सुवार्ता सांगितली.

18कारण येशूच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश होतो.

19यामुळे, तुम्ही आता परके आणि परराष्ट्रीय नाहीत. तर त्याएेवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात

20तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.

21संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे.

22त्याच्यामध्ये तुम्हीसुध्दा इतरांबरोबर आत्म्याच्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.



 <<  Ephesians 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran