Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 36 >> 

1नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्त्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.

2ते म्हणाले, परमेश्वराने इस्त्राएलाला चिठ्या टाकून आमचे वतन घेण्याची आज्ञा केली आहे. याप्रकारे परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.

3आता जर त्या इस्त्राएलाच्या वंशातल्या दुसऱ्या कोणत्याही वंशांच्या मुलाशी विवाह केला तर त्यांचे वतन आमच्या वडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल.

4आणि जेव्हा इस्त्राएलाच्या वंशाचे योबेल होईल तेव्हा ज्यांच्या त्या होतील त्यांच्या वंशाच्या वतनात त्यांचे वतन मिळवले जाईल, अशाने त्यांचे वतन आमच्या वडिलांच्यावंशाच्या वतनातून काढून टाकले जाईल.

5मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून इस्त्राएल लोकांना ही आज्ञा दिली, तो म्हणाला, योसेफाच्या वंशाचे म्हणणे बरोबर आहे.

6सलाफहादाच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हाला कोणाशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वंशातील कोणाशी तरी लग्न करा.

7यामुळे इस्त्राएल लोकांमध्ये वतन एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्त्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.

8आणि इस्त्राएल वंशातल्या कोणत्याही एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून वतन मिळाले तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.

9तेव्हा इस्त्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्त्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल.

10सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले.

11म्हणून सलाफहादच्या महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले.

12योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील होते. म्हणून त्याची वतन त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.

13परमेश्वराने यार्देनपाशी यरीहोजवळ मवाबाच्या मैदानात मोशेच्याद्वारे इस्त्राएलाच्या वंशाना दिलेल्या या आज्ञा व नियम आहेत.



 <<  Numbers 36 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran