Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Corinthians 5 >> 

1कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे.

2ह्या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पाेशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत.

3आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही.

4कारण ह्या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे.

5आणि ह्याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हाला तयार केले तो देव आहे; आणि त्यानेच आम्हाला आत्मा हा विसार दिला आहे.

6म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत; कारण आम्ही हे जाणतो की, आम्ही शरिरात रहात असताना प्रभूपासून दूर आहो.

7कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही;

8आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.

9म्हणून आम्ही झटत आहो, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.

10कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्याला त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.

11म्हणून आम्हाला प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो; पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशीही आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहो.

12कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हाला आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, माणसाच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे.

13कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी, आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत.

14कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले,

15आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.

16म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.

17म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;

18हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली;

19म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता, आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.

20तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हाला आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.

21कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.



 <<  2 Corinthians 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran