Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Timothy 1 >> 

1देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून

2विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.

3मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंति केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात राहावे, जेणेकरुन तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.

4आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या, पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कल्पीत कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो.

5आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुध्द अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.

6या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.

7त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.

8परंतु आम्हाला हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे.

9आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन आणि अधर्मी, अशुध्द, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक

10जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुध्द शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीहि आहे.

11गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.

12ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.

13जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो, पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.

14परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.

15ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयला जगात आला, आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.

16परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.

17आता सर्वकालचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.

18तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.

19आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.

20त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.



 <<  1 Timothy 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran